Monday, October 23, 2017

सरकार Bullet Train आणि आपण

        

          मुंबईच्या Elphinstone Stampade मध्ये बावीस ते तेवीस जणांचा मृत्यू झाला. ह्या बातमी ने देशाच्या राजकारणाला व रेल्वे मंत्रालयास हादरे दिले. अच्छे दिन वाल्या सरकारवर असंतोष निर्माण झाल्याची ही आणखी एक वेळ. तरूणां पासुन ते एका नऊ महिन्यांचा बाळाची आई व वयोवृद्ध लोकांचा ह्या मध्ये मुत्यु झाला. सरकार मध्ये असुन पण नेहमी विरोधाची भुमिका घेणारी शिवसेना तर पियुष गोयल ह्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होती.

            ह्या दोघांच्या राजकारणात व भक्तांच्या अडमुट पणा मुळे लोकांचे हाल मात्र झाले. ह्या सर्व प्रकारा मुळे मला नेहमी प्रश्न पडतो की आपल्याला बुलेट ट्रेन ची नक्की गरज आहे का ? ..

           मी तर बुलेट ट्रेनला आजच्या काळातील 'ताजमहाल' असं म्हणतो. दोन्ही बाजूने विचार करणे गरजेचे आहे. सरकारचं असं म्हणं पडतं की देशात काही मोठं केल्या शिवाय हा देश काही पुढे जाणार नाही ! .. ह्या प्रकल्पात जापान फायनान्स करणार आहेच.. पण त्या बरोबरच बुलेट ट्रेन मुळे नवीन इंफ्रास्टकचर ची निर्माती होईल व देशाचे Standardization वाढेल असे त्यांचे म्हणणे पडते. ह्यात काही गैर नाही पण भारत सरकार नवीन टेक्नोलॉजी मध्ये इंणवेस्टमेंट करतोय हे चांगलेच आहे परंतु जर आपण सर्व नवीन गोष्टी करत राहिलो तर जुन्या गोष्टींचा Updation किंवा दुरूस्ती  चं काय ?..
           SAFETY हा रेल्वे च्या बाबतीतला मुळ मुद्दा आहे. ह्यात तर जापान ने कोणताही लेखी दिलेला नाही सेफ्टी च्या बाबतीत.
मला तर नेहमी प्रश्न पडतो की ही बुलेट ट्रेन नक्की कोणासाठी ? .. ह्याचा फायदा तर सुट-बुट,एसी बस,विमान मध्ये फिरणार्या लोकांचाच होणार .. मग ह्या देशातल्या सामान्य माणसाचा फायदा काय ?.. आपण तरी ह्या सुट-बुट वाल्या सरकार कडून काय अपेक्षा ठेवणार ?..

            थोड्याच दिवसा पुर्वी राज ठाकरे यांची मुलाखत ऐकली, त्यात त्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. एक तर बुलेट ट्रेन ही लांब प्ल्यां साठी असते, जर करायचीच होती तर दिल्ली ते मुंबई किंवा दिल्ली ते चेन्नई अशी करायला हवी होती. प्रांतवाद तर मोदींचा आवडता विषय !

ह्यानी बुलेट ट्रेनच काम सुरू केले ते पण अहमदाबाद ते मुंबई... तिथेच झाला व्यापार्यांचा आणि श्रीमंताची दिवाळी ! हेच तर आजकालच्या महाराष्ट्रातील भक्तांना कळत नाही.
             शेवटी ह्या बुलेट ट्रेन नावाच्या 'ताजमहाल' बद्द्ल एवढेच मत मांडतो की -
बुलेट ट्रेन ही आपल्या गरजेची नाही,सरकारने रेल्वे चे पहिले बेसिक Infrastructure सुधारणे गरजेचे आहे. ह्यात देशात लाखो लोक नुसते रेल्वे ह्या कारणांमुळे मरतात (सुविधा उपलब्ध नसल्याने मुळे). करोडोंचा पैसा ह्या प्रकल्पात Invest होणार आहे ते ही गुजराथी उद्योजकांना .. मग बाकी देशाचं काय ?
मुठ भर लोकांच्या फायद्या साठी देशाला वेडा बनवणे योग्य नाही !

             छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन करूण देशाची सेवा केली व पुढे विकास झाला..
                                                                         एक आपले महाराज होते आणि... आताचे हे ●●●
                                  
                                                                                                                        - योगेश धनंजय जाधव
 

No comments:

Post a Comment

Best Brands for Solar Battery at Home

Batteries are one of the most used appliances in our day to day lives. You all have been using batteries at your homes in which almost al...