● गुलमोहर ●
तुटलेली फुलं त्या झाडाला परत कधीच जोडता येत नाहीत पण ..
गुलमोहराकड़े पाहिल्यावर तुटलेला आत्म-विश्वास मात्र नक्कीच जुळून येतो, नवी चेतना देवून जातो !
तो म्हणजे गुलमोहर !
ज्याच्या कडे पाहिल्यावर मन प्रसन्न होते,
तो म्हणजे गुलमोहर !
ज्याच्या कडे पाहिल्यावर आयुष्यात रंग,गंध, आणि मैत्रीचा छंद निर्माण होतो,
तो म्हणजे गुलमोहर !
भर उन्हात थांबुणही या निसर्गाला आपल्या फुल रूपी गारवा देतो,
तो म्हणजे गुलमोहर !
या जगात लागणारी मनःशांती जी पैसा देवू शकत नाही तिच लागणारी मनःशांती
गुलमोहर सहज देवून जातो !
असा हा गुलमोहर फुलल्यावर ..
वार वाहू लागतं !
फुले एका मागे एक धावू लागतात..
एका झाडा वरून दुसर्या झाडावर जावू लागतात..
निसर्गा च्या हिरवाईचा आनंद पसरवत !
- योगेश धनंजय जाधव
No comments:
Post a Comment